या दिवाळीत ‘गोलमाल अगेन’ हा रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीजमधला नवा कोरा सिनेमा येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील सिनेचाहते या सिनेमाची वाट पाहत असून, रोहित शेट्टीच्या या चित्रपटाच्या एक महिन्या आगाऊ बुकिंगला चक्क पाकिस्तानमध्ये देखील सुरुवात झाली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "हा एक कॉमेडी सिनेमा असून, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन यातून होणार असल्यामुळे, कोणत्याही प्रकारचे वाद किवा समस्या यातून व्यक्त होत नसल्यामुळे, पाकिस्तानमध्ये त्याच्या प्रसिद्धीसाठी कोणताच अडथळा येणार नाही’
‘गोलमाल अगेन’ ह्या सिनेमाला यूएस, यूके आणि मिडल इस्ट सारख्या पारंपारिक परदेशी प्रदेशांबरोबरच पोर्तुगाल, पेरू, जपान, युक्रेन येथेदेखील रिलीज केले जाणार आहे. रोहित शेट्टी पिक्चर्स यांच्या सहकार्याने रोहित शेट्टीची निर्मिती आणि दिग्दर्शित असलेला 'गोलमाल अगेन' हा सिनेमा 20 ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होत आहे.